मुंबई, 09 मे : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही इमोशनल असतात, काही मजेशीर असतात. पण सध्या लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ चक्क नवरदेवाची लग्नातच धुलाई करण्यात आली आहे. ही धुलाई दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क नवरदेवाच्या सासऱ्याने केली आहे.
नवरदेव, जावई म्हणून त्याला खूप मान असतो. पण इथं मात्र वेगळंच दृश्य आहे. लग्नात जावयाचा पाहुणचार, मान दूर त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या सारऱ्यांनीच त्याची चपलेने धुलाई केली आहे. भरमंडपात सासऱ्यांनी जावयाला चपलेने धुतलं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेवासमोर एक व्यक्ती हातात चप्पल घेऊन आहे. ती नवरदेवाला चपलेने मारते आहे. बिच्चारा नवरदेव हात जोडून माफी मागतो आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासरा असल्याचं सांगितलं जातं आहे. नवरदेवाने हुंडा मागितला म्हणून सासऱ्यांनी त्याला मारलं, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामॅननी मारला चान्स; लाजिरवाण्या कृत्याचा VIDEO
याचं कारण म्हणजे नवरदेवाचा नको तो हट्ट. नवरदेवाने लग्नात नको तीच मागणी केली. त्यामुळे नवरीचे वडील संतप्त झाले. त्यांना इतका राग आला की त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता नवरदेवाला चोप दिला. त्याने लग्नात हुंडा मागितला. हुंडा म्हणून त्याने बाईक मागितली. सासऱ्यांनी हुंडा द्यायला नकार दिलाच. पण सोबतच हुंडा मागणाऱ्या जावयाला अद्दलही घडवली. तिथंच त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.
खरंच की काय? कपलचं नाल्यात रोमँटिक फोटोशूट; PHOTO VIRAL, सर्वजण शॉक
दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे, नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासराच आहे का, ही मारहाण हुंड्यासाठीच झाली का? याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही.
दहेज का विरोध करें, परन्तु इस तरीक़े का समर्थन नहीं! https://t.co/RGX8AJJK04
— RK Vij (@ipsvijrk) May 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.