बंगळुरू, 07 एप्रिल : दोन वेळा आय़पीएल विजेता केकेआरने आरसीबीविरुद्ध घरच्या मैदानावर दणदणीत विजय मिळवला. चार वर्षांनी केकेआर त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळत होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात झाल्यानंतरही केकेआरने २०४ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीने फलंदाजीला उतरल्यानंतर चांगली सुरुवात केली. मात्र केकेआरच्या फिरकीसमोर त्यांचा डाव गडगडला. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडलं.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पहिल्याच षटकापासून आरसीबीला दणके दिले. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या फाफ डुप्लेसिसचा त्रिफळा उडवला. फाफ डुप्लेसिसला वरुणची गुगली समजली नाही. त्यानतंर पुढच्या षटकात वरुणने मॅक्सवेलला बाद केलं. तर दोन चेंडूनंतर त्याने हर्षल पटेललासुद्धा त्रिफळाचित केलं.
RCBला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
ICYMI – TWO outstanding deliveries. Two massive wickets.
Sunil Narine & Varun Chakaravarthy get the #RCB openers early on.
Follow the match – https://t.co/J6wVwbsfV2#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/GvL1U1GRWW
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.