अमरावती, 13 एप्रिल : तशा पोलीस ठाण्यात काही विचित्र तक्रारी आल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका अजब तक्रार चर्चेत आली आहे. एका श्वानाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या श्वानाला अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या श्वानावर त्याने मुख्यमंंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमधील हे विचित्र प्रकरण आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा अपमान केल्याबद्दल चक्क एका कुत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दासरी उदयश्री नावाच्या महिलेने विजयवाडा इथल्या काही महिलांच्या गटासह ही तक्रार दिली आहे.
आता एक श्वान, मुका जीव कसा काय कुणाचा अपमान करू शकतो? कोणत्या आधारावर ही तक्रार देण्यात आली आहे आणि त्याला अटक करण्याची मागणी होते आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. या श्वानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
VIDEO – आधी फळं खायला दिली, नंतर…; फळविक्रेत्या महिलेचं काम पाहून सर्वजण थक्क
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा श्वान एका भिंतीवर लावलेलं पोस्टर फाडताना दिसतो आहे. आपल्या पुढच्या पायांच्या पंजांनी तो पोस्टर फाडचो आहे. हे पोस्टर मुख्यमंत्र्यांचं आहे.
माहितीनुसार दासरी उदयश्री नावाच्या महिलेसह काही महिलांनी की तक्रार दिली आहे. ही महिला विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टीची (टीडीपी) कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं आहे.
In a bizarre incident, a police complaint by a group of women has been filed against a dog for tearing a poster of #AndhraPradesh CM Y. S. Jagan Mohan Reddy.#YSJagan pic.twitter.com/U7vbqkWO9n
— IANS (@ians_india) April 13, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.