चंद्रपूर, प्रतिनिधी : जिल्ह्यातील उसेगाव येथे गुप्ता महामिनरल्स माइनिंग ॲन्ड बेनिफिकेशन प्रा.लि कंपनीत विजयक्रांती कोल ॲन्ड मिनरल्स कंत्राटी कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलत असतांना शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले की, कामगार बंधू-भगिनी कुठल्याही उद्योगाच्या कणा असतात. त्यांना कार्यस्थळी सुव्यवस्था व सुरक्षेबरोबरच कामाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयक्रांती संघटनेची स्थापना केलेली आहे.
या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे यांच्यासह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने शिवानी वडेट्टीवार यांचे आभार मानले.