आधुनिक भारताचे शिल्पकार, संगणक आणि दूरसंचार क्रांतीचे जनक देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीदिनी आज ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयात राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन भारताला आधुनिक जगाची कवाडं देशाला खुले करून दिली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी काही पावले आज भारत उचलत आहे त्याचा पाया राजीव गांधी यांनी रचला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शेती,शिक्षण,रोजगार,उद्योग यासह विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.