राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांमुळे आणि अनेक लढवय्ये क्रांतिकारकांच्या बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळाले. यावर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. – माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार
ज्या विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या विचारांवर चालणारा काँग्रेस हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, शुर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची माहिती गावोगावी पोहचावी यासाठी काँग्रेस पक्षाने “भारत जोडो अभियान पदयात्रा” सुरू केली आहे.
भारत जोडो पदयात्रेने काँग्रेस पक्ष संपूर्ण देशाला नवा संदेश देत आहे. भाजप देशाला उद्ध्वस्त करत असून देशाला एक ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देत आहे. ‘ ब्रिटिश भारत सोडा’ या घोषणेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लाखो भारतीयांनी एकत्रीत येऊन ती घोषणा सार्थ केली होती, त्यामुळेच आपण आज स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत. काँग्रेस पक्षाने आता पुन्हा एकदा भारत जोडो हा नारा दिला आहे. हे कामही इंग्रजांना भारतातून हाकलण्याइतकेच अवघड आहे, पण अशक्य नाही.