विशेष प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. १२) सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य व दंतचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबीरात हृदयरोग, शल्यचिकित्सा, बालरोग, प्रसुती व स्त्रीरोग, कान-नाक-घसा, दंतचिकित्सा, अस्थिरोग, नेत्ररोग, आयुष वैद्यकीय अधिकारी इत्यादी तज्ञ डाॅक्टर्स उपस्थित राहुन सेवा देणार आहेत. शिबीरादरम्यान रुग्णांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येईल. त्यासाठी शिबीरात येतांना रुग्णांनी आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणावे.
तसेच या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर यांचीही तपासणी करून त्याचे निदान करण्यात येणार आहे. आणि हायड्रोसील, हर्निया व इतर गाठीची शस्त्रक्रियादेखील मोफत करण्यात येईल. यावेळी रक्ताच्या सर्व तपासण्या, सोनोग्राफी, ईसीजी करण्यात येणार असून स्त्रीरोग संबंधित सर्व आजार, स्तनाच्या गाठी, गरोदर व स्तनदा मातांच्या सर्व तपासण्या करून त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.
या शिबिरात कृष्ठरोग, क्षयरोग, गुप्तरोग, हिवताप, हत्तीरोग, एड्स यांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
तरी या शिबीराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन ब्रम्हपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटी, महिला तालुका व शहर काँग्रेस कमिटी, युवक तालुका व शहर काँग्रेस कमिटी, तालुका व शहर काॅग्रेस सेवादल, एनएसयुआय यांच्या वतीने करण्यात आले आहे.