विशेष प्रतिनिधी, सिंदेवाही : राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसेच बहुजन कल्याण मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी व सर्व फ्रंटल संघटनाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
दरवर्षी १२ डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा वाढदिवस याही वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संकट कुठलेही असो, कायम मदतीला तत्पर असलेले लोकप्रतिनिधी म्हणून विजय वडेट्टीवार ओळखले जातात. सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन असो, किंवा विधानसभेत लढणे असो, कुठेच ते कमी पडत नाही अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तसेच लोकाभिमुख कामातून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
म्हणून अशा जनसेवकाचा वाढदिवस देखील समाजकार्यातून साजरा व्हावा ह्याच उदात्त हेतूने महा रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, नगर काँग्रेस कमिटी सिंदेवाही, काँग्रेस सेवा दल तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी यावेळी सांगितले.