विशेष प्रतिनिधी, सावली : राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि बहुजन कल्याण मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वड्डेटीवार यांचा १२ डिसेंबर हा वाढदिवस. या निमित्ताने सावली तालुका काँग्रेस कमिटीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कायम जनतेत वावरणारे नेते म्हणून राज्यभर विजय वडेट्टीवार यांचा कार्यकर्त्यांचा मोठा गोतवळा आहे, त्यातच वाढदिवस म्हटले की कार्यकर्त्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते. ह्याचे निमित्त साधत सावली तालुका काँग्रेस कमिटीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये चित्रकला, निबंध तसेच एकलनृत्य स्पर्धेबरोबरच फळवाटप आणि भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहेत.
तरी नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केले आहे.