मुंबई,दि.३०: भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील रेती माफियांनी तहसिलदार डॉ.अनिकेत सोनावणे यांच्यावर केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय आहे.चंद्रपूर जिल्हयातील अवैधरित्या रेतीचा लिलाव करणा-यांवर तसेच तहसिलदारांवर हल्ला करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या तहसिलदारांच्या गाडी सुमारे २० फुट अंतरापर्यंत फरपटत नेली.तहसिलदारांसोबत असलेल्या पथकातील कर्मचारीही थोडक्यात बचावले तहसिलदार व त्यांचा पथकावर हल्ला करणा-यांवर या घटनेमध्ये दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले आहेत. जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी करणा-यांवरही कडक कारवाई करण्यात यावी असेही निर्देश मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिले