कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढील ८-१० दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवसांत कोरोना रुग्णसंख्या किती वाढतेय याचा आढावा घेतला जाईल.काय परिस्थिती निर्माण होईल त्यावर निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला बराच कालावधी आहे.परंतु ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कार्यक्रम ठरेल. कोरोना परिस्थिती तशी उद्भवली तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी लागेल असं त्यांनी सांगितलंय.
तसेच, निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होणं, पुन्हा संसर्ग वाढणं यामुळे निवडणुका टाळता येतील का याचा विचार होईल.आम्ही विनंती करू परंतु निवडणुका घ्यायच्या की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे असंही स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.त्यामुळे राज्यात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेळेवर होणार का? हा प्रश्न आता उभा राहत आहे.