मुंबई : मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे वाढणारा उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. मोचा चक्रीवादळामुळे हवामान बदलत आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अवकाळी पावसानं अतोनात पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Heavy to very heavy rainfall and Squally winds over Andaman & Nicobar Islands during 08th to 12th May pic.twitter.com/Adnqc8nU1w
— India Meteorological Department (@Indiametdept) May 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.