मुंबई 18 मे : मोचा चक्रीवादळ म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर रविवारी धडकलं. त्याचे परिणाम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत. या चक्रीवादळामुळे उष्णतेत जास्त वाढ झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांसोबतच पुण्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच हवामान खात्याने पुणेकरांसाठी पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे.
पुणे शहर आणि परिसरात आज आकाश दिवसभर निरभ्र राहणार आहे. या काळात उन्हाचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. तर, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आठवडाभरापासून पुण्यासह राज्यभरातच उन्हाची तीव्रता वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंशांच्या वर आहे. तर हे तापमान 45 पर्यंत पोहोचेल असं सांगितलं जात आहे.
Mumbai Weather Update : मुंबईकरांनो, वाढत्या उन्हापासून तुमची सुटका नाही, पाहा आज किती असेल तापमान
तुमच्या शहरातून (पुणे)
आगामी काही दिवसांमध्येही मुंबई शहरातील तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये बुधवारी (17 मे) कमाल 33° तर किमान 28° तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या आवठवडाभरापासून मे हिटचा तडखा बसत आहे. राज्यासह देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. तर, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी तापमान 44 अशांवर गेलं आहे. सूर्य आग ओकत असल्याने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरत आहे. अशात नागरिक या उकाड्यापासून सुटका कधी होणार आणि मान्सून कधी येणार, याची वाट पाहात आहेत. मात्र, यंदा मान्सूनही लांबणीवर पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 4 जून रोजी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तविला आहे. तर ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने 7 जूनची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापर्यंत देशाच्या बहुतांश भागांमध्ये उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.