मुंबई, 27 मार्च : राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र तरी देखील अद्यापही पावसाचं सावट आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात वातावरण कोरडे राहणार असून, कमाल तापमानात तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भावर पावसाचं सावट
राज्यात पावसामुळे रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. गारपीट आणि पावसामुळे ज्वारी, गहू, हरबारा या पिकांचं तसेच आंबा, केळी, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात आता पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भात तीस मार्चपर्यंत हवामान ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात उन्हाचा तडाका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उन्हाचा कडाका वाढणार
मार्च संपत आला आहे. मात्र मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या झळा म्हणाव्या इतक्या जाणवल्या नाहीत. मात्र आता पावसाचं सावट सरल असून, तापमानात तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा कडाका वाढू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.