मुंबई, 26 मार्च : भारतात सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अवघ्या 75 धावांवर दिल्ली कॅपिटल्सचा निम्मा संघ माघारी परतवला आहे.
महिला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु असलेल्या अंतिम सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात गोलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करून सामन्यावर पकड मिळवली. दुसऱ्याच षटकात मुंबईने दिल्लीची धाकडं फलंदाज शफाली वर्माची विकेट घेतली. इस्सी वोंगने टाकलेल्या चेंडूवर शफालीने शटकात ठोकण्याचा प्रयन्त केला असता ती झेल बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दिल्लीच्या अॅलिस कॅप्सीची देखील विकेट घेण्यात आली.
जेमिमा रॉड्रिग्सने मैदानात उतरून मेग लॅनिंग सोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयन्त केला. परंतु 8 चेंडूवर 9 धावा देऊन ती देखील झेल बाद झाली. अवघ्या 35 धावांवर दिल्लीच्या 3 विकेट पडल्या. 11 व्या षटकात मुंबईने मारिझान कॅपची विकेट घेतली, त्यानंतर लगेचच 12 व्या षटकात अमनज्योत कौरच्या चेंडूवर मेग लॅनिंग धाव बाद झाली. विकेटकिपर यस्तिका भाटियाने दिल्लीच्या संघाची धाव संख्या अवघ्या 75 वर असताना मेग लॅनिंगची विकेट घेतली. त्यानंतर 13 व्या षटकात अरुंधती रेड्डी, 14 व्या षटकात जेस जोनासेन तर 16 व्या षटकात मिनू मणी आणि तानिया भाटिया यांची लागोपाठ विकेट घेण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.