मुंबई, 24 मे : आयपीएल 2023 संपल्यानंतर एका आठवड्यामध्येच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला सुरूवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात 7 जून ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल होईल. याआधी 2021 ला झालेल्या फायनलमध्येही भारताने धडक मारली होती, पण न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता, त्यामुळे दुसऱ्या फायनलमध्ये विजय मिळवून इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश न मिळवलेले टीम इंडियाचे खेळाडू लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत, तर ज्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत, त्यांचे खेळाडू स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडला जातील.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी रवी शास्त्री यांनी आधीच टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन सांगून टाकली आहे. मागच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलवेळी रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते.
रवी शास्त्रींच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोण?
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत, शार्दुल ठाकूर, आर.अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
फायनलसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, श्रीकर भरत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
ऑस्ट्रेलियन टीम
मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट रॅनशॉ, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, कॅमरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी, जॉश इंग्लिस, पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड, जॉश हेजलवूड, नॅथन लायन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.