मुंबई, 6 मे : आयपीएल 2023 मधील 49 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर 6 विकेट्सने विजय मिळवून आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. यासामन्या दरम्यान WWE मधील पैलवान आणि फायटर जॉनसिना याने एम एस धोनीचा विकेटकिपिंग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. यात एम एस धोनीच्या चेन्नई संघातील गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या तब्बल 8 विकेट्स घेतल्या. यात गोलंदाज दीपक चहर आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2, माथेशा पाथीरनने 3 तर रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतली. एम एस धोनीच्या विकेटकिपिंगमधील चतुराई आणि चपळता देखील या सामन्यात पाहायला मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.