दारव्हा आणि नेर मध्ये माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि संजय देशमुख यांना मोठा धक्का
Yavatmal : जिल्ह्यासह राज्यात बाजार समितीची निवडणूक (APMC Elections) नुकतीच पार पडली. यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले असले, तरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे मात्र अपवाद ठरलेले आहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ३ पैकी २ बाजार समित्यांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. एकूणच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पालकमंत्री राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट दिसतंय.
काल रविवारी दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Darvha APMC) निवडणुकीची मतमोजणी पार पडली. ज्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या शिवसेना (Shivsena) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे. या निवडणुकीत मंत्री राठोड यांनी आपले वर्चस्व कायम राखले असून दोन माजी मंत्र्यांना धूळ चारत मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावरचा विश्वास कायम राखत त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या पॅनलला कौल दिला आहे. जवळपास १५ वर्षानंतर दारव्हा बाजार समितीसाठी (Darvha APMC) निवडणूक होत होती, त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पालकमंत्री राठोड यांच्या पॅनेलसमोर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनल होते, मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. विशेष म्हणजे, याआधी नेर बाजार समितीत (Ner APMC) पालकमंत्री राठोड यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १८ पैकी १० जागा जिंकत सत्ता आपल्या हाती राखली आहे.
या निवडणुकीला पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासोबत सहकार क्षेत्रातील प्रखर अनुभवी नेते होते. तसेच पालकमंत्र्यांनी निवडणुकीचे केलेले उत्तम नियोजन, त्यांचे असलेले काम आणि सर्वसामान्यांसोबतचा दांडगा जनसंपर्क हाच विरोधकांवर भारी पडला. त्यामुळेच गेल्या २० वर्षांपासून विरोधकांच्या हातात दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीची (Darvha APMC) निवडणूक अटीतटीची करून ४ जागांवर यश मिळविले. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.